
बीड,(रिपोर्टर)ः- सध्या सुरु असलेल्या खरीप हंगामात शेतकर्यांस आर्थिक अडचण निर्माण होत आहे. एक रुपयात पीक विमा ही योजना शासनाने गुंडाळली. तर नवीन पीक विम्या साठी शेतकर्यांना बँकानी प्रचंड नियम व अटी लादल्या आहेत. बँके कडुन शेतकर्यांचे सिबिल तपासले जात आहे. या विरोधात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे व विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांच्या शेतकरी हिताच्या संकल्पने नुसार जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत जाऊन अधिकार्यांची शाळा घेऊन कानउघडणी केली.
शिवसेना प्रदोत सुनिलजी प्रभू, प्रवक्त्या सुषमाताई अंधारे व संपर्क प्रमुख परशुरामजी जाधव यांच्या आदेशानुसार आज शिवसैनीकांनी आपला मोर्चा बँके कडे वळवला. पीक कर्जासाठी आलेले अर्ज किती? मंजूर अर्ज किती? नामंजूर अर्ज किती? प्रलंबित अर्ज किती व प्रलंबाचे कारण काय? पीक कर्जाचे उद्धीष्ट किती? शेतकर्यांना सिबिल चे कारण सांगून किती शेतकर्यांचा अर्ज नामंजूर केला? या सह असंख्य प्रश्न उपस्थित करून शिवसैनिकांनी बँक अधिकार्यांची शाळा घेतली.
यावेळी महिला जिल्हा संघटक मीरा ताई नवले, जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के, उपजिल्हाप्रमुख राजूभाऊ महुवाले, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे,कामगार सेना रवी वाघमारे,नवनाथ प्रभाळे, सरपंच प्रदीप कोटुळे,सतीशसिंह परदेशी, गणेश लोणकर, मच्छिंद्र काळे, सतीश मस्के, नंदकुमार घोगरे,शेख मुजमिल,रमेश नवले,विशाल तांबे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.





