
बीड, (रिपोर्टर)ः- आज बीडमधील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मुख्य शाखेमध्ये शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने ’बँकेची शाळा’ आंदोलन करण्यात आले.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना सचिव विनायकजी राऊत, संपर्कनेते सुनिलजी प्रभू , महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब व संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख गणेश भाऊ वरेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बीड शहरातील बँक आॉफ इंडियाच्या जालना रोड बीड येथील मुख्य शाखेमध्ये आंदोलन करण्यात आले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बीड जिल्ह्यातील पक्षाच्या वतीने बँकांची शाळा हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी संबंधित शाखेच्या शाखा व्यवस्थापक यांना आत्तापर्यंत किती शेतकर्यांना कर्ज दिले आहेत, किती अर्ज आले आहेत, शेतकर्यांच्या खात्याला होल्ड का केले आहे. सिबिल का मागितले जाते असे अनेक प्रश्न विचारले व सविस्तर माहिती घेतली.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर म्हणाले की, शेतकर्यांच्या कुठल्याही कामासाठी तुम्ही अडवणुक करु नका जर शेतकर्यांना आडवले तर शिवसेना बीड जिल्ह्याच्या वतीने आम्ही बँकांचे कामकाज होऊ देणार नाहीत आणि पीक कर्ज देण्यास नकार दिल्यास शाखेत जाऊन शाखा अधिकार्यांना काळे फासु असा इशारा दिला.
या आंदोलनाला जिल्हा सहसचिव श्रीकृष्ण गायके, युवा सेना तालुका अधिकारी बारीकराव येवले, उप तालुकाप्रमुख अशोक सगळे, उप तालुकाप्रमुख रामनारायण जाधव, तालुका सचिव नंदकुमार येवले, युवानेते मुकेश घुमरे, भरत खरात, विशाल पटेकर, महेश लांडगे, ज्ञानेश्वर सिंघन , राजेंद्र भोसले, सखाराम बेंगडे, कृष्णा तांदळे, रामा कदम, बाबु कुंटे, चंदू बजगुडे, किशोर गायके, समाधान वरेकर, बबलू तिपाले, बबनराव काकडे, प्रविण पवार यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





