
पाच महिन्यांचे मानधन थकले
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बीड (रिपोर्टर): विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारने मुख्यमंत्री कौशल्य योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत राज्यभरात हजारो युवकांना अकरा महिन्याच्या कंत्राटी बेसवर नियुक्त केले होते. बीड जिल्ह्यात 2300 बेरोजगारांना या योजनेअंतर्गत नियुक्त केले होते.त यांना फक्त एक महिन्याचा पगार दिला असून पाच महिन्यांचा पगार मिळाला नसल्याने पगारासाठी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरच बेरोजगारांसाठी मुख्यमंत्री कौशल्य योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत राज्यभरात हजारो बेरोजगारांना विविध कार्यालयात कंत्राटी बेसवर अकरा महिन्यांसाठी नियुक्त करण्यात आले होते. सदरील बेरोजगारांना फक्त एक महिन्याचा पगार अदा करण्यात आला.






