
सीसीटिव्ही फुटेल आणि क्लास रूमचा तपास करा
विद्यार्थीनी बचाव संघर्ष समितीची मागणी
बीड, (रिपोर्टर)ः- कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थीनीच्या अत्याचार प्रकरणाचा तपास महिला अधिकार्याकडे देण्यात यावा तसेच क्लासेस परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात यावेत यासह इतर मागणीचे निवेदन आज जिल्हा पोलीस अधिक्षक यांना विद्यार्थीनी बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, पिंक पथकाकडील तपास काढून घेण्यात यावा हा तपास महिला पोलीस अधिकार्याकडे वर्ग करण्यात यावा, कोचिंग क्लासेसमधील सीसीटिव्ही फुटेज आणि आसपासच्या कोचिंग क्लासेसचा तपास करण्यात यावा, प्रत्येककोचिंग क्लोससमधील स्टाफ मध्ये दोन महिला कर्मचार्याची नियुक्ती असावी, आरोपीला मदत करणार्या प्रत्येकाचे सीडीआर आणि एसडीआर तपासून त्यांनाही आरोपी करण्यात यावे, सदर आरोपींना कोर्टात नेतांना हातकड्या घालण्यात याव्यात यासह इतर मागण्यांचे निवेदन संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी अॅड.संगीता धसे, शांताबाई पाळवदे, शैला मसूळे, मंगलताई जायभाय, किरण डोळस, हिराबाई कांबळे, सचिन उबाळे, महेश धांडे, अनुरूध्द वीर, सोमेश कदम यांच्यासह आदींची उपस्थिती होती.






