आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह पदाधिकार्यांची उपस्थिती; ग्रा.पं.वर भगवा फडकवण्याचा निर्धार
बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये १२९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव हे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात डेरेदाखल आहेत. आज त्यांनी बीड शहरामध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
१५ जानेवारी रोजी ग्रामपंचातींसाठी मतदान होत असल्याने ग्रा.पं.वर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना कामाला लागली. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी काल केज येथे मेळावा घेतल्यानंतर आज शहरातील एका हॉटेलमध्ये सर्व पदाधिकार्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळुक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे, शहरप्रमुख सुरवसे, नितीन धांडे, बहीर, सुशील पिंगळे, यांच्यासह आजी-माजी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.