Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home बीड गेवराई पांदण रस्त्यासाठी बेलगुडवाडी ग्रामस्थ करणार तहसिल कार्यालयासमोर आंदोलन

पांदण रस्त्यासाठी बेलगुडवाडी ग्रामस्थ करणार तहसिल कार्यालयासमोर आंदोलन


गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील मौजे बेलगुडवाडी येथील ६० ते ७० शेतकर्‍यांचा रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदने देऊन पाठपुरावा केला मात्र याबाबत कुठलाच निर्णय न झाल्याने येथील शेतकर्‍यांना आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात २८ डिसेंबर पर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
बेलगुडवाडी शिवारातील गट क्रमांक ८६ मधील पूर्वीपासून रहदारी असणारा पांदण रस्ता आडविल्यामुळे येथील अनेक शेतकर्‍यांचा ऊस या रस्त्यामुळे उभाच असून वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करून हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली परंतु प्रशासनाने व संबंधित अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या शेतकर्‍यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला असून दि.२८ रोजी हे सर्व ग्रामस्थ तहसिल कार्यालया-समोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जिल्हा-धिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...