
बीड, (रिपोर्टर)ः- दिव्यांगाचा पाच टक्के निधी नगर पालिका देण्यास टाळाटाळ करत असल्याने आज न.प. कार्यालयासमोर अपंग जनता दलाच्या वतीने ठाण मांडण्यात आले आहे. यावेळी अनेक दिव्यांगांची उपस्थिती होती.
बीडनगर पालिकेकडून दिव्यांगांचा पाच टक्के निधी देण्यात आलेला नाही. या निधीसाठी वेळोवेळी मागणी केली मात्र त्यावर नगर पालिका फक्त उडवा उडवी करत आली आहे. निधी संदर्भात आज संघटनेच्या वतीने न.प. कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी अलिम पठाण, मोमीन नसरीन, शेख खान सत्तार, शेख सलिम, सय्यद बबलू यांच्यासह आदींची उपस्थिती होती.






