,
विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू.
धारूर (रिपोर्टर): धारूर तालुक्यात एका 14 वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अंकुश किसन गवळी (वय 14 वर्षे) हा 3 जून 2025 रोजी 12 ते 12:30 च्या दरम्यान तो गावातीलच गुणवंती तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता. मात्र, तो विहिरीत पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, मात्र त्याला पोहायला येत नसताना सुद्धा त्याला भीमा लक्ष्मण गवळी 45 वर्षे, माऊली अशोक मोरे 35 वर्षे, अर्जुन लक्ष्मण गवळी 52 वर्षे, शशिकला अशोक मोरे सर्व राहणार सुकळी ता. धारूर, यांनी मासे पकडण्यासाठी त्याला सोबत घेऊन गेले.
व तलावातील बाजूलाच असलेल्या विहिरीमध्ये तो बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदाकिनी किसन गवळी यांच्या फिर्यादी नंतर या चारही आरोपींविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात 187/2025 कलम 106(1), 3(5), इछड 2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिरसाळा पोलीस करत आहेत. या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. युवकाच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.









