
5 लाखांचचा ऐवज लंपास
धारूर (रिपोर्टर): तालुक्यातील बोडखा येथे चोरीची घटना घडली असून चोरट्याने घराचा कडी-कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील सोन्या-चांदीच्या रकमेसह एकूण 5 लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
धारूर तालुक्यातील बोडखा येथील गंगाधर तुकाराम तिडके (वय 65 वर्षेे) याच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यातील सोन्याच्या दागिन्यांसह नगदी असा एकूण 5 लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. आपल्या घरात चोरी झाल्याचे तिडके यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दिंद्रुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









