बीड ( रिपोर्टर)
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेेल्या तक्रार आर्जामध्ये कारवाई न करण्यासाठी पोलिस कर्मचार्याने सबंधीताकडे लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती सात हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही लाचेची रक्कम बसस्थानक पोलिस चौकीमध्ये घेत असतांना पोलिसाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये एक तक्रार अर्ज दाखल झाला होता. यामध्ये कारवाई न करण्यासाठी ठाण्याचे पो. ह. चरनसिंग वळवी याने लाच मागितली यात ७ हजार रुपयाची तडजोड झाली. याबाबत सबंधिताने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. आज पैसे देण्याचे ठरले होते. त्यानुसार बसस्थानकातील चौकीमध्ये वळवी यास पैसे देण्यात आले. लाच स्विकारतांना पोलिसास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस अधिक्षक राहूल खाडे, अप्पर अधिक्षक अनिता जमादार उपअधिक्षक बालकृष्ण हानपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रविद्र परदेशी, पो.ना. श्रीराम गिराम, गोरे, गारदे, कोरडे आदिंनी केली.