
बीड, (रिपोर्टर)ः- पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व धरणे तुडूंब भरले असतांना मराठवाड्यातील धरणे मात्र कोरडे आहेत. गेल्या तीन दिवसापासून राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडतआहे.या पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील धरणात अधिकच पाणी साठा वाढला. मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. आज स्थितीत मराठवाडयातील धरणे कोरडे आहेत. माजलगावच्या धरणात फक्त 10 टक्के तर मांजरा धरणात 25 टक्के पाण्याचा साठा आहे. दमदार पाऊस झाला तरच मराठवाड्यातील धरणात पाणी साठा वाढू शकतो.
जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उलटला तरी मराठवाड्याच्या धरणामध्ये पाण्याचा साठा जमा झालेला नाही. गेल्या तीन दिवसापासून राज्यातील विविध भागात पाऊस पडत आहे. हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पडत आहे. मात्र मराठवाड्यात मध्यम आणि हालक्या स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाड्यातील धरणात पाण्याचा साठा अंत्यंत कमी आहे. फक्त जायवाडी धरणात 76 टक्के पाणीसाठा असून माजलगाव धरणात फक्त 10 टक्के तर नांदेडच्या विष्णूपुरीत 23 टक्के, परभणीमधील दुधणामध्ये 35 टक्के तर मांजरा धरणामध्ये 25 टक्के पाण्याचा साठा जमा झालेला आहे. बीडजिल्ह्यातील धरणातही पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. फक्त शहराजवळील बिंदूसरा धरण भरले आहे. इतर धरणातील पाणीसाठा वाढण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.








