
उद्दीष्ट होते 1440 कोटी वाटप झाले 715 कोटी
बीड, (रिपोर्टर)ः- शेतकर्यांना पीककर्ज वाटप करतांना बँकांनी अकडता हात घेवू नये असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने संबंधित बँकांना दिलेले असतांनाही बँकांनी पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण केलेले नाही. बीड जिल्ह्याला 1440 कोटीचे उद्दीष्ट दिले होते. आतापर्यंत फक्त 715 कोटी पीककर्ज वाटप झाले आहे. जशी बीड जिल्ह्याचीपरिस्थिती आहे तशी एकूण मराठवाड्याचीही तशीच आहे. मराठवाड्यात देखिल पीककर्ज 40 टक्केपर्यंत वाटप करण्यात आले आहे.
मराठवाडा दुष्काळ ग्रस्त आहे. मराठवाड्यातील शेतकरी आर्थिक टंचाईत असतात. मराठवाड्यातील शेतकर्यांना वेळेवर पीककर्ज वाटप करण्याचे निर्देश राज्य सरकारने बँकांना दिलेले आहे. मात्र बँका टार्गेट नुसार पीककर्जाचे वाटप करत नाहीत. बीड जिल्ह्याला 1440 कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र आतापर्यंत फक्त 715 कोटीच पीककर्जाचे वाटप झाले. संत गतीने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. जी परिस्थिती बीड जिल्ह्याची आहे तीच परिस्थिती अवघ्या मराठवाड्याची आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही पीककर्जाचे वाटप कमीच झालेले आहे. मराठवाड्यात फक्त 40 टक्के पीककर्ज वाटप करण्यात आलेले आहे.









