• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दुर्दैव ! महाराष्ट्राची वर्षा रंडकी, मंत्रालय झालं सचिवालय; मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे

by reporter
August 6, 2022
Reading Time: 1 min read
0
दुर्दैव ! महाराष्ट्राची वर्षा रंडकी, मंत्रालय झालं सचिवालय; मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) लोकशाही व्यवस्थेत लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी सरकार आणि राज्य हाकत असताना सचिवालय नाव असणे योग्य नसल्याचे सांगून तेव्हा शंकरराव चव्हाणांनी सचिवालयाचे नामांतर मंत्रालयात करून लोकनियुक्त राजकारभार सुरू केला होता. आता राज्यात जे शिंदे-फडणवीसांचं सरकार आहे ते लोकांनी निवडून दिलेला आहे. केवळ मंत्रिपदाच्या लालसेपोटी अंतर्गत वाद होऊ नयेत म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला गेल्याने गेल्या महिना-दीड महिन्यापासून महाराष्ट्राची ‘वर्षा’ रंडकी झाली आहे. महाराष्ट्राचे जणू पितृछत्र हरपले आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य अक्षरश: उघड्यावर पडले आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्र्यांचा सर्व कारभार सचिवांकडे सोपवून पुन्हा लोकनियुक्त राज्य कारभाराला नख लावत अप्रत्यक्षरित्या मंत्रालयाचं सचिवालय केल्याचे दिसून येते.
30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून 36 दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्र्यांकडे अनेक प्रकारचे अधिकार असतात, पण राज्यात मंत्रीच नाहीत. यामुळे विविध विभागांची कामे अडली आहेत. अर्धन्यायिक स्वरुपाची अपीले, पुनर्विलोकन, पुनर्परीक्षण अर्ज तसेच अंतरिम आदेशासाठीचे अर्ज दाखल करणे, अंतरिम आदेश पारित करणे आणि तातडीच्या प्रकरणाची सुनावणी तसंच निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडे असतात. मात्र, आता मंत्रीच नसल्याने हे अधिकार अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव तसंच सचिवांकडे दिले आहेत.
गृह, महसूल, नगरविकास या विभागांमध्ये अनेक प्रकारची अपीले प्रलंबित असतात. अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, ग्रामविकास, शिक्षण या खात्यांकडे सातत्याने सामान्य माणसांशी संबंधित वा सार्वजनिक संस्थांशी संबंधित अपिलांवर सुनावणी होत असते. गेल्या 35 दिवसांपासून त्या संबंधीची प्रक्रिया अडलेली होती. ही कामे मंत्र्यांशिवाय अडू नये म्हणून मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा
मुहूर्त ठरला नाही
सरकार स्थापन होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केली. मात्र तरीही विस्तार लांबणीवर पडला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. येत्या 8 ऑगस्टला यावर सुनावणी होईल. आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवलं जातं की आणखी काही निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे पण त्यानंतरच विस्तार होण्याची शक्यता आहे.

म्हणून शंकररावांनी सचिवालयाचं मंत्रालय केलं होतं
ब्रिटिश राजवटीनंतर देशभरातीलच प्रशासकीय मुख्यालयांना सचिवालय असे म्हटले जायचे. कारण आयएएस अधिका-यांच्या अधिपत्याखाली प्रशासनाचा कारभार सुरू असायचा. म्हणून प्रशासकीय मुख्यालयांना सचिवालय असे नाव असायचे. मात्र शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना हे नाव खटकले होते. लोकशाही व्यवस्थेत लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी सरकार राज्य हाकत असताना सचिवालय नाव असणे योग्य नाही. ज्या ठिकाणाहून लोकनियुक्त राज्यकारभार सुरू आहे म्हणजे मंत्रीमंडळ अस्तित्वात आहे, अशा वास्तूला मंत्रालय हेच नाव योग्य ठरेल, असे मत शंकरराव चव्हाण यांनी मांडले होते.

Previous Post

‘गेट वेल सून कोश्यारी तात्या’, युवक राष्ट्रवादीच्या आंदोलनाला शिरूरमधून सुरुवात

Next Post

भाजपाच्या सत्तेत स्व.मुंडे अपघात विमा योजनेला मुदतवाढ नाही, आघाडी सरकारने मुदतवाढ दिली; फडणवीसांचे घोडं कुठे अडले?

संबंधित बातम्या

क्राईम

गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप, पहाटेच घरात घुसून गंभीर कृत्य

by गणेश सावंत
May 15, 2025
महाराष्ट्र

भाजपाचा मंत्री विजय शहावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

by गणेश सावंत
May 15, 2025
देश विदेश

उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार्‍या भाजपा मंत्र्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

by गणेश सावंत
May 15, 2025
क्राईम

बीडमध्ये बालविवाहानंतर 15 वर्षाखालील 10 मुली गर्भवती, तर 11 जणींची प्रसूती; धक्कादायक आकडेवारी समोर

by गणेश सावंत
May 15, 2025
बीड

बीड बायपासच्या लक्ष्मी चौकात रात्रीतून संभाजी महाराजांचा पुतळा

by गणेश सावंत
May 14, 2025
Next Post
भाजपाच्या सत्तेत स्व.मुंडे अपघात विमा योजनेला मुदतवाढ नाही, आघाडी सरकारने मुदतवाढ दिली; फडणवीसांचे घोडं कुठे अडले?

भाजपाच्या सत्तेत स्व.मुंडे अपघात विमा योजनेला मुदतवाढ नाही, आघाडी सरकारने मुदतवाढ दिली; फडणवीसांचे घोडं कुठे अडले?

ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान

ब्रेकिंग -मांजरसुबा पासून कंटेनरने अनेकांना उडवले ,चिरडले चार जण ठार, २५ च्या आसपास जखमी

May 16, 2025

गढी ग्रामपंचायत कार्यालयास ग्रामसेवक नसल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली

May 15, 2025

गाई घेवून जाणारा टॅम्पो पकडला

May 15, 2025

गर्लफ्रेंडने फोन न उचलल्याने तरुणाचा संताप, पहाटेच घरात घुसून गंभीर कृत्य

May 15, 2025

जिल्हा परिषदमध्ये बदलीची प्रक्रिया सुरू

May 15, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ब्रेकिंग -मांजरसुबा पासून कंटेनरने अनेकांना उडवले ,चिरडले चार जण ठार, २५ च्या आसपास जखमी
  • गढी ग्रामपंचायत कार्यालयास ग्रामसेवक नसल्याने ग्रामस्थांची कामे खोळंबली
  • गाई घेवून जाणारा टॅम्पो पकडला

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?