• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home Uncategorized

भाजपाच्या सत्तेत स्व.मुंडे अपघात विमा योजनेला मुदतवाढ नाही, आघाडी सरकारने मुदतवाढ दिली; फडणवीसांचे घोडं कुठे अडले?

by Beed Reporter
August 6, 2022
Reading Time: 1 min read
0
भाजपाच्या सत्तेत स्व.मुंडे अपघात विमा योजनेला मुदतवाढ नाही, आघाडी सरकारने मुदतवाढ दिली; फडणवीसांचे घोडं कुठे अडले?
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

अपघात विमा योजनेचे प्रस्ताव घेणे पाच महिन्यापासून बंद; सर्वसामान्य शेतकर्‍यांसह मुंडे समर्थकांत संताप
बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रातील कष्टकर्‍यांचा बुलंद आवाज म्हणून आपले उभे आयुष्य खर्ची घालणारे स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने अपघात विमा योजना काढून लोकहिताचा निर्णय आणि कष्टकरी, कामगार, शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारने केला. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि ज्या पक्षासाठी स्व.मुंडेंनी आपले उभे आयुष्य खर्च केले त्या भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात स्थापन झाले. मात्र दुर्देवाने गेल्या पाच महिन्यापासून स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा एकही अर्ज राज्यात स्विकारला नाही. शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेला मुदतवाढच दिली नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात सर्वसामान्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेली गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला यावर्षी मुदतवाढ मिळालेली नाही. हे वर्ष संपत आले तरी सरकारने या विमा योजनेला मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे 6 एप्रिल 2022 पासून या अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकर्‍यांचे प्रस्ताव घेणे बंद आहे. गेल्यावर्षी 7 एप्रिल 2021 रोजी या योजनेला मुदतवाढ दिल्याने अपघातग्रस्त शेतकर्‍यांचे विमा योजनेचे प्रस्ताव घेण्यात येत होते. यावर्षी मात्र 5 महिने उलटले तरी राज्य सरकारकडून या योजनेला मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकर्‍यांचे कुटूंबीय या विमा योजनेच्या मुदतवाढीची प्रतिक्षा करत आहेत. गेल्यावर्षी 7 एप्रिल 2021 रोजी एका वर्षभरासाठी या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकर्‍यांचे कृषी विभागाने प्रस्ताव घेतले होते. गेल्या वर्षभरात 295 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी 57 प्रस्तावाला मंजूरी मिळालेली होती. 223 प्रस्ताव अद्यापही मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्ण कुटूंब आर्थिक अडचणीत येते. त्यामुळे या शेतकर्‍यालाआर्थिक मदत व्हावी म्हणून महाविकास आघाडी सरकारने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू केली होती. प्रत्येकवर्षी राज्य सरकारकडून प्रस्ताव घेण्यासाठी मंजूरी दिली जाते. गेल्यावर्षी या विमा योजनेला मंजूरी दिल्यानंतर राज्यभरातून 295 अर्ज कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी 266 अर्ज कृषी विभागाकडून विमा कंपनीकडून स्विकारून त्यातून 57 अर्ज निकाली काढून या कुटूंबीयांना विमा योजनेचा लाभ देण्यात आला होता. 7 एप्रिल 2022 पासून म्हणजेच गेल्या पाच महिन्यापासून या योजनेला मुदतवाढ झालेली नाही. त्यामुळे गेल्यावर्षी मंजूरीच्या प्रतिक्षेत असलेले अर्ज आणि यावर्षी ज्या शेतकर्‍यांचा अपघात झालेला आहे किंवा अपघातग्रस्त शेतकर्‍यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचे कुटूंबीय या विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारकडून मंजूरीची वाट बघत आहेत. अपघातग्रस्त शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास त्याला दोन लाख रूपये लाभ या विमा योजनेतून देण्यात येतो. विज पडून मृत्यू होणे, सर्पदंशी, विंचू, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात किंवा विद्युत शॉक लागुन मृत्यू झाल्या, अंधत्व आल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्या कुटूंबीयाना दोन लाख रूपये या विमा योजनेअंतर्गत देण्यात येतात. या विमा योजनचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना कोणत्याही विमा योजनेचा लाभ घेतलेला नसावा, त्याचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 75 वर्षे याच्यापुढे नसावे अशा अटी आहेत.

Previous Post

दुर्दैव ! महाराष्ट्राची वर्षा रंडकी, मंत्रालय झालं सचिवालय; मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे

Next Post

अग्रलेख- महाराष्ट्र तितुका कापावा, मराठी धर्म नासवावा

संबंधित बातम्या

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका
Uncategorized

‘मी थांबणार नाही, झुकणार नाही…; पंकजा मुंडेंनी जाहीर केली भूमिका

by Beed Reporter
June 3, 2023
जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पंचायत राज समिती जिल्हा दौर्‍यावर
Uncategorized

अखेर माफीनामा दिलेल्या त्या 54 शिक्षकांना पदस्थापना

by Beed Reporter
June 2, 2023
विशेष संपादकीय…
Uncategorized

अग्रलेख- तुका म्हणे, शिंदळीच्या व्यर्थ श्रमविली वाचा बोल बजगरं बली की जय..!

by Beed Reporter
May 14, 2023
मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती
Uncategorized

मॅराथॉन अग्रलेख भाग-1 राष्ट्रवादीची शरशय्या अन् पवारांची नीती

by Beed Reporter
May 6, 2023
केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त
Uncategorized

केज तालुक्यात पुष्पावर छापा; गावठी कट्ट्यासह एक पिस्टल, चोरीचे चंदन, पंधरा जिवंत काडतूस, दोन लोखंडी कोयते, एक रामपूरी चाकू जप्त

by Beed Reporter
May 6, 2023
Next Post
विशेष संपादकीय…

अग्रलेख- महाराष्ट्र तितुका कापावा, मराठी धर्म नासवावा

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?