नगरपालिकेची नुसतीच टोलवा टोलवी
बीड, (रिपोर्टर)ः- बीड शहरामध्ये रमाई घरकुल योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. काहींनी अर्धे बांधकाम केले. लाभार्थ्यांना हप्ते मिळायला पाहिजे होते. मात्र नगर पालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे त्यांना अजुन हप्ते मिळालेले नाहीत. काहींनी उसणवारी करून बांधकाम केले. असे लोक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे टाकण्याची मागणी केली जावू लागली आहे.
काही महिन्यापुर्वी बीड शहरातील अनेक लाभा
र्थ्यांना रमाई घरकुल योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले. संबधित लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू केले. काहींची बांधकाम 50 टक्के झाले आहे. टप्प्यानुसार लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे पडत असतात. मात्र गेल्या तीन महिन्यापासून लाभार्थ्यांना पैसे देण्यात आलेले नाहीत. पैसा संदर्भात लाभार्थी नगर पालिकेमध्ये चकरा मारून बेजार झाले. न.प.च्या अनागोंदी कारभारामुळे लाभार्थ्यांना पैसे मिळत नसल्याचे दिसून येवू लागले आहे.








