जिल्ह्यासाठी 76 कोटी 63 लाख रूपये मंजूर
बीड, (रिपोर्टर)ः- रोजगार हमी योजने अंतर्गत रस्त्यांसह इतर कामे सार्वजनिक स्तरावर केली जात असतात. त्या कामाचे कुशल बिल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले. जिल्ह्यासाठी 76 कोटी 63 लाख 83 हजार रूपये आले आहेत. हे पैसे त्या त्या तालुका पंचायत समितीकडे वर्ग करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधितांना या पैशाचे वाटप करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात रोेहियो अंतर्गत कामे केली जातात. सार्वजनिक आणि व्यक्तीक कामे रोहियो अंतर्गत केली जातात. वैयक्तीक कुशलचे नुकतेच बिल आले, त्याचे वाटप ही पुर्ण होत आले आहे. आता सार्वजनिक कुशलचे बिल आले आहे. जिल्ह्यासाठी 76 कोटी 63 लाख 83 हजार रूपये मंजूर करण्यात आलेले आहेत. रोहियोच्या नागपुर विभागाने बीडकडे हे पैसे वर्ग केले आहेत. त्या त्या पंचायत समिती कार्यालयाकडे हे पैसे वाटप करण्यात येणार त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग होणार आहेत.








