
बीड (रिपोर्टर): मराठवाड्यामध्ये गेल्या तीस ते पस्तीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेती पिकांचे नुकसान होऊ लागले होते. रात्री मराठवाड्यातल्या काही भागात पावसाने हजेरी लावली. परळी तालुक्यातील सिरसाळा, माजलगाव यासह जिल्ह्यातल्या काही भागात दमदार पाऊस पडल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले.
गेल्या एक महिन्यांपासून मराठवाड्यात पाऊस पडला नसल्याने खरीप पिकं सुकू लागली होती. रात्री मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातल्या सिरसाळा, माजलगाव यासह इतर ठिकाणी चांगला पाऊस पडल्याने पिकांना जीवदान मिळाले. काही ठिकाणी धो-धो पाऊस पडल्याने तेथील ओढ्यांना पाणी आले होते. जिल्ह्यात आणखी चांगल्या पावसाची गरज आहे.









