नवी दिल्ली (वृत्तसेवा) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सर्वकाही आलबेल झाले आहे, असे वाटत असतानाच मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य करून अकारण वाद निर्माण करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (इहरसरीं डळपसह घेीहूरीळ) यांना सक्तीचे मौन बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या दिल्लीत आहेत. यावेळी महाराष्ट्र सदनात त्यांच्या हस्ते ’हर घर तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्याकडे अक्षरश: पाठ फिरवत तेथून काढता पाय घेतला.