बीड (रिपोर्टर)-आज ४२४ संशयितांचे अहवाल आरोग्य विभागाला आले असून यामध्ये केवळ २२ जण पॉझिटिव्ह आलेे आहेत.
सध्या आरोग्य विभागानेच कोरोनाच्या रुग्णांचा मागोवा घेणे बंद केले आहे. जो रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी केली जात नाही. सदरील रुग्ण कोणाच्या संपर्कात आला याबाबत विचारणा केली जात नाही, पुर्वी एक पॉझिटिव्ह रुग्ण कोणा कोणाच्या संपर्कात आला त्या सर्वांच्या आरोग्य विभाग तपासण्या कर होते मात्र आता तसे होत नाही. ज्याला त्रास होतो त्यानेच रुग्णालयात जावून स्वॅब द्यावा, असा अलिखित नियम आरोग्य विभागाने काढला आहे त्यामुळे दिवसेंदिवस संशयितांचा आकडा कमी होत आहे. काल केवळ ४२४ संशयितांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्याचा अहवाल आज दुपारी सव्वा बारा वाजता आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्यामध्ये केवळ २२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये अंबाजोगाई २, आष्टी ४, बीड ७, गेवराई २, माजलगाव १, परळी ४, शिरूर-वडवणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.