बीड, (रिपोर्टर)ः- जनावरे खरेदी आणि विक्री न करण्याचा निर्णय कुरेशी संघटनेनी घेतल्याने त्याचा परिणाम जनावरांच्या आठवडी बाजारावर होवू लागला. आज नेकनूरचा आठवडी बाजार होता, या बाजारात मोठ्या प्रमाणता जनावरे विक्रीसाठी येत असतात. पण कुरेशी संघटनेच्या निर्णयामुळे आजच्या बाजारात शुकशुकाट दिसून आला.
जनावरे वाहनाद्वारे घेवून जात असतांना अनेक वेळा विविध प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. त्याच बरोबर पोलीस प्रशासनाकडून खोटे गुन्हे ही दाखल केले जात असल्याने या नेहमीच्या त्रासाला कंटाळून कुरेशी संघटनेने 19 जुलै पासून जनावरे खरेदी विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रविवारी नेकनूरचा आठवडी बाजार असतो हा आठवडी बाजार मराठवाड्यामध्ये प्रसिध्द आहे. या बाजारात विविध ठिकाणावरून जनावरे विक्रीसाठी येत असतात. कुरेशी संघटनेच्या निर्णयामुळे आजच्या आठवडी बाजारात शुकशुकाट दिसून आला.









