
बीड (रिपोर्टर): राजकीय, सामाजीक क्षेत्रातील लोकांसह सर्वसामान्यांशी दांडगा जनसंपर्क असलेले दादासाहेब मुंडे यांच्यावर काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या या निवडीने बीड जिल्ह्यासह राज्यभरात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार असल्याचे सांगण्यात येते. निवडीबद्दल दादासाहेब मुंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारीश केलेल्या प्रदेश कार्यकारिणीला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व वेणुगोपाल यांनी मान्यता दिली. त्यानुसार आज प्रदेश काँग्रेसने एक यादी जाहीर केली असून त्या यादीमध्ये दादासाहेब मुंडे यांना पुन्हा महाराष्ट्राच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सामाजीक व राजकीय लोकांसोबत संपर्क असणार्या दादासाहेब मुंडे यांना काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरावर पक्ष-संघटनेत महत्वपूर्ण जबाबदारी दिचल्याने त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.








