
सेंटर लॉकमुळे दुकानाचे शटर वर झाले नाही
टाकरवण( रिपोर्टर):- माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे चोरट्यांचा सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे च्या सुमारास घडली आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.टाकरवण परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
टाकरवण येथील मुख्य बाजार रोडवर दत्तात्रय काकडे यांचे श्री मंगलनाथ ज्वेलर्स नावाने सोन्याचे दुकान आहे.गुरुवारी पहाटे 3:30वाजेच्या सुमारास चोरट्यानी चोरी करण्याच्या उद्देशाने श्री मंगलनाथ ज्वेलर्स दुकाना बाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्याचे केबल कनेक्शन कट केले.त्यानंतर टांबीच्या साह्याने शटर चे दोन्ही बाजूचे कोंडे वाकवून तोडले.मात्र शटरला असलेल्या सेंटर लॉक मुळे या चोरट्यांचा चोरीचा मोठा प्रयत्न फसला असल्याने दुकान मालकाचे मोठे नुकसान टळले आहे.चोरट्यांनी अतिशय चाणक्षबुध्दीने कॅमेरा मध्ये न येता कॅमेरे कनेक्शन बंद केले.मात्र या धाडसी चोरीच्या घटनेच्या प्रयत्नामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत.तरी परिसरात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याकडून राञीच्यावेळी ग्रस्त वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
गुरुवारी पहाटे टाकरवण परिसरात चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे.ज्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला तेथील कॅमेरे कनेक्शन तोडून बंद केले असले तरी. काही अंतरावर असलेल्या साईकृपा मेडिकल येथे काही वेळ चोरटे थांबले होते.तेथील सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये दोन चोरटे कैद झाले आहेत.तोंडाला रुमाल बांधलेला हातामध्ये चोरीसाठी आणलेले काही साहित्य त्यांच्याकडे असल्याचे दिसत आहे.








