
रात्री परळी-सिरसाळा रस्त्यावर घडली घटना
परळी (रिपोर्टर): ट्रकचे टायर बदलत असताना चालकास भरधाव वेगात निघालेल्या स्विफ्ट कारने जोराची धडक दिली. या अपघातात चालक गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना रात्री पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान परळी-सिरसाळा रोडवर घडली.
सय्यद मकदूम सय्यद जफर (वय 45 वर्षे रा. पेठ मोहल्ला परळी) यांच्या ट्रकचे टायर खराब झाल्याने ते परळी-सिरसाळा रस्त्यावर टायर बदलत असताना पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांना जोराची धडक दिल्याने यात चालक गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. धडक दिलेल्या कार चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.

ट्रक तीन वाहनांना धडकली
केज शहरातील बसस्थानकासमोर गतीरोधक नसल्यामुळे या महामार्गावरून वाहने भरधाव वेगाने वाहतात. आज सकाळी ट्रक एसटी आणि क्रुझर या दोन वाहनांना धडकली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली नाही.









