
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बीड (रिपोर्टर): राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक आणले असून हे विधेयक अन्यायकारक आहे, हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज महाविकास आघाडी बीडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. गेल्या काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक आणलेले आहे. या विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हाषणार आहे. विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी विविध पक्ष-संगटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आहे.








