
बीड(रिपोर्टर): पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब, संपर्कनेते सुनिल प्रभू साहेब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब व संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या सोमवार रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचारी व कलंकीत मंत्र्यांना हाकला व इतर अनेक मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बीड जिल्हा पक्षाच्या वतीने बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर यांच्या नेतृत्वाखाली जन अक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना,व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर, माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रमिलाताई माळी, तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन बीड, तालुकाप्रमुख विनायक बप्पा मुळे वडवणी, तालुकाप्रमुख बाबा सराफ धारुर यांनी केले आहे.
स्व सरपंच संतोष अण्णा देशमुख स्व महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या खून झाला आहे आता केज मध्ये दलित हत्याकांड होणार आहे मला वाचवा दलित आंबेडकर समाजाचे शेतकरी सरोदे यांनी कलेक्टरकडे कुटुंबासमवेत आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. केज अंबाजोगाई मध्ये दलित आंबेडकर समाजावर सातत्याने अन्याय होत आहे मला आणि माझ्या कुटुंबाला धमकवलं जात आहे 53 गुंठ्ठे जमीन बळकवण्याचा प्रयत्न गावगुंड करत आहेत दलित समाजाचे आमदार नमिता मुंदडा यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेलो निवेदन दिले मात्र त्या एक शब्दही बोलल्या नाहीत.








