
बनावट लाडकी बहिनींचा शोधा सुरू, नेमकं कारण काय ?
पात्रुड,(रिपोर्टर)ः- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेमुळेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्याचे बोलले जात आहे.मात्र, आता या योजनेचा अनेकांनी गैरफायदा झाल्याचे उघड होत आहे. योजनेच्या निकषांमध्ये न बसणार्या अनेक महिलांनीही आर्थिक लाभघेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थीविरोधात गृह चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींची आता गृह चौकशी करायला सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभ घेतलेल्या तब्बल 26 लाख महिलांची गृह चौकशी होणार होणार आहे. एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या तब्बल 26 लाख महिलांची यादी म हिला व बालकल्याण विभागाने तयार केलीय. दरम्यान, राज्यात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख 34 हजार महिलांना काही दिवसांपूर्वी अपात्र ठरवले होते
’त्या’ महिलांची योजना बंद होणार
या सर्व महिलांची विभागानुसार चौकशी करायला सुरुवात करण्यात आली आहे. एकाच घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्या जास्तीच्या महिलांची योजना बंद होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या दोन कोटी 29 लाख महिलांना मिळत आहे. आणखी लाडक्या बहिणी यातून वगळल्या जाण्याचे संकेत आता मिळत आहेत.








