
उद्घाटनास तीन मंत्र्यांची उपस्थिती
बीड (रिपोर्टर): भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव विशेष कार्यक्रमांतर्गत बीडमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र 24 व 25 ऑगस्ट रोजी पार पडत असल्याची माहिती संयोजन समितीचे मार्गदर्शक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दिली.
24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उद्घाटन होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी मंत्री डॉ. अशोक उईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, अदिवासी विभागाचे राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्यासह मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे.









