वडवणी भैय्यासाहेब तांगडे
बीड जिल्ह्यातील वडवणी न्यायालयीन क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या सरकारी वकील आत्महत्येच्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. दोन दिवसांपूर्वी सहाय्यक सरकारी अभियोक्ता विनायक चंदेल यांनी न्यायालयाच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत न्यायालयातील न्यायाधीश रफिक शेख व लिपिक तारडे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या अपमानामुळे व मानसिक त्रासामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद केले होते.
या घटनेनंतर जिल्हाभरात खळबळ उडाली होती. चंदेल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर या प्रकरणीमुलाच्या वडवणी पोलिसात न्यायाधीश रफिक शेख व लिपिक तारडे यांच्याविरोधात “आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी” गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वकील व कायदे व्यवसायातील मंडळींनीही या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, न्यायालयीन परिसरातील तणावग्रस्त वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडवणी पोलीस करत आहेत.
चंदेल यांच्या मुलाने फिर्यादीत काय म्हटले
भी विश्वजित विनायक चंदेल वय 19 वर्षे व्यवसाय शिक्षण रा. इंदेवाडी ता. जि. परभणी मो.नं- समक्ष पोलीस स्टेशन वडवणी येथे हजर येवून फिर्याद देतो कि, मी वरील ठिकाणचा रहीवाशी असून मला एक भाऊ अजित व आई सुरेखा असे असून माझे वडील विनायक लिंबाजी चंदेल हे जानेवारी 2025 मध्ये एमपीएससी परीक्षेद्वारे सरकारी वकील म्हणून नोकरीस लागलेले असून त्यांची वडयगी कोर्टामध्ये नेमणूक झालेली होती. माझे वडीलांनी जानेवारी 2025 पासून ते मे 2025 रोजी पर्यंत वडवणी कोर्टात व्यवस्थित नोकरी करत होते. जुन 2025 रोजी पासून नाझे वडील सुट्टीमध्ये घरी आल्यानंतर बऱ्याचदा चिंताग्रस्त असायचे, आमचे एकञ कुट्व असल्याने माझे आजोबा लिंबाजी चंदेल, आई सुरेखा चंदेल, चुलते मुरलीधर चंदेल, विक्रम चंदेल असे आम्ही सर्वांनी त्यांना अस्वस्थ राहण्याचे कारण विचारले, त्यावेळी वडीलांनी सांगीतले कि, जुन 2025 मध्ये वडवणी कोर्टात रफीक शेख नावाचे नवीन जज आलेले आहेत व ते दैनंदिन कामकाज करीत असताना मला ते विनाकारण अपमानित करुन मानसिक त्रास देत आहेत व न्यायालयीन कामाकाजामध्ये मनमानी काम करत आहेत असे वडीलांनी आम्हाला सांगीतले होते. त्यानंतर जेव्हा जेव्हा वडील घरी येत होते तेव्हा ते सांगत होते कि, ” मला वडवणी कोर्टाचे रफीक शेख यांचा आस सुरुच आहे व तो वाढत चालला आहे.
दिनांक. 09.08.2025 रोजी रक्षाबंधन सणाकरीता माझे वडील विनायक चंदेल हे घरी आले होते त्यावेळी त्यांनी मला व माझी आई, आजोबा, दोन्ही चुलते यांना सांगीतले कि” दडपणी कोर्टाचे जज रफीक शेख हे मला सतत कोर्टाचे कामकाज चालु असतांना सर्वांसमोर अपमानित करतात व तायडे नावाचा क्लार्क हा मी गुन्ह्याची फाईल घेत असताना मला अपमानास्पद शब्द वापरतो व कोर्टाचे जज माझा अपमान करीत असतांना तायडे त्यामध्ये सामील असतो. मला जज रफीक शेख व तायडे क्लार्क यांचा खुप आस होत आहे. मी त्याच्या ञासाला वैतागलेलो आहे. मला वडवणी कोर्टात नोकरी करु वाटत नाही” असे वडीलांनी सांगीतल्यावर आम्ही त्यांना समजावून सांगून ” आपण तेथून बदली करुन घेवू तुम्ही टेंशन घेवू नका” असे समजावून सांगीतले होते. तसेच माझे आजोबा योनी वडीलांना सांगीतले कि, ” जज साहेब आपले काय शेजारी नाहीत ? एकतर त्यांची बदली होईल किंवा आपली बदली होईल तु टेंशन घेवू नको काही दिवस आस सहन करून नोकरी कर” अरो सांगीतले होते त्यानंतर दिनांक. 11.08.2025 रोजी वडील घरीहून कामकाजा करीता कोटे वडवणी येथे गेलो होते.
दिनांक. 15.08.2025 रोजी माझे आजोबा लिंबाजी विठ्ठलराव चंदेल हे वडील विनायक चंदेल यांना भेटण्यासाठी वडवणी येथे गेले होते, राजी आजोबा घरी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगीतले कि, विनायक यास वडवणी कोर्टातील जज रफीक शेख व क्लार्क तायडे यांचे जाणीवपुर्वक अपमानीत करुन त्रास देणे सुरुच आहे त्यामुळे तुझे वडील हे राजीनामा देतो असे म्हणत, होते परंतु मी त्यास समजावून सांगीतले कि, आता नोकन्या लागत नाहीत तु काही काळजी करु नको आपण येथून बदली करुन घेवू असे वडीलांना सांगीतले आहे. असे आजोबांनी घरी आल्यावर सांगीतले.
दिनांक. 20.08.2025 रोजी सकाळी आकरा वा. सुमारास माझ्या आत्याचा मुलगा बळीराम कछवे यांनी माझ्या वडीलांचे मोबाईवर फोन केला त्यावेळी तो फोन वडवणी येथील पोलीसांनी उचलला व त्यांनी सांगीतले कि ” सरकारी वकील विनायक चंदेल यांनी सरकारी वकील कार्यालयातील खिडकीस गळफास घेतलेला आहे, तुम्ही वडवणीला या” असे मला बळीराम कछवे याने सांगीतले नंतर माझे चुलते मुरलीधर चंदेल, सोपान बायस, बळीराम कछवे, हनुमान चंदेल व इतर नातेवाईक असे वडवणी येथे गेले त्यावेळी वडीलांना सरकारी दवाखाना येथे नेले होते त्यावेळी तेथे त्यांनी पोलीसांनी वडीलांचे खिश्यामध्ये मिळून आलेली चिट्ठी दाखविली त्यामध्ये ” मा. JMFC रफीक शेख हे माझा कोर्टामध्ये सर्वा समोर अपमान करत असतात व माझे म्हणणे न एकता किंवा माझा विनंती अर्ज न स्विकारता मनमानी आदेश पारीत करतात. तायडे कलक (clark) हे सर्व केसमध्ये सर्व साक्षीदारांना समन्स काढतात माझे म्हणने किंवा अर्ज न घेता व मला असहकार्य करतात ह्या दोघांच्या त्रासाला कंटाळून मला आत्महत्या करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही याची चौकशी करुन न्याय द्यावा हि विनंती” असे पञ मा. मुख्य न्यायाधिश्च साहेब, उच्च न्यायालय, मुंबई यांना लिहले असलेला मजकुर चिष्ड्डी मध्ये नमुद आहे. व दुसऱ्या चिठ्ठीमध्ये [email protected], supremecourt.nic.in असे नमुद आहे. ते पाहील्यानंतर पोलीसांनी वडीलांचे प्रेतावर पंचनामा करून सरकारी दवाखाना वडवणी येथे त्यांचे प्रेतावर पी. एम करुन प्रेत अंत्यविधी करीता आमचे ताब्यात दिल्यानंतर गावी इंदेवाडी ता. जि. परभणी येथे अंत्यविधी केला आहे.
तरी दिनांक. 20.08.2025 रोजी सकाळी 11.00 वा. सुमारास माझे वडील विनायक लिंबाजी चंदेल वय-47 वर्षे रा. इंदेवाडी ता. जि. परभणी ह.मु वडवणी यांनी वडवणी कोर्टाचे जज रफिक शेख व क्लार्क तारडे यांनी मिळून वडीलांना सतत अपमानित करुन मानसिक त्रास दिवून आत्महत्या करण्यास पवृत्त केले त्यामुळे त्यांच्या त्रासाळा कंटाळून वडीलांनी कोर्ट वडवणी येथील सरकारी वकील कक्षामधील खिडकीचे गजास शालीचे पट्टीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. नाझ्या वडीलांनी लिहून ठेवलेली चिड्डी मला वडवणी पोलीसांनी दाखविली त्यामधील हस्ताक्षर व सही माझ्या वडीलांचीच आहे. आज रोजी माझी व कुटुंबाची मनस्थिती ठिक झाल्यानंतर मी पोलीस स्टेशन वडवणी येथे येवून तक्रार देत आहे.
माझी वरील प्रमाणे फिर्याद तोंडी सांगीतली ती संगणाकावर टंकलिखित केली ती वाचून पाहीली सांगणे प्रमाणे बरोबर व खरी आहे.








