बीड (रिपोर्टर): शहेंशाहवली दर्गाच्या ऊर्सनिमित्त 27 ऑगस्ट रोजी कव्वालीचे आयोजन करण्यात आले असून या कव्वाली कार्यक्रमाचा लाभ नागरिकांना घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील प्रसिद्ध असलेल्या शहेंशाहवली दर्गाचा संदल 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे तसेच ऊर्स 27 ऑगस्ट 2025 ला असून 27 ऑगस्टच्या रात्री नऊ वाजता कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रफिक नाशाद, आरेफ हैरा यांच्या कव्वाली होणार असून या कार्यक्रमाचे आयोजक मिथून मधुकर शिनगारे, ऊर्स कमिटीचे अध्यक्ष झहीर अली शाह कादरी, रफिक नाशाद, अकबर खान, शेख रौनक, राजू इनामदार, फय्याज खॉ इनामदार, हाजी हाफीज इनामदार, शकील खान सह आदी आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





