
तीन फुटाचे राणे जरांगेंना धमक्या देतात-दीपक केदार
बीड, (रिपोर्टर)ः- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन होत आहे. या आंदोलन कर्त्यांच्या मागण्या राज्य सरकारने समजून घेतल्या पाहिजेत असे सांगत शासनाचे प्रतिनिधी मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत आणि जरांगे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. राज्याचे मंत्री नितेश राणे तीन फुटाचे आहेत आणि ते जरांगेंना धमक्या देतात. त्यांना कोणाचे समर्थन आहे असा प्रश्न उपस्थित करत हाके सारखे माणसं समाजात द्वेष निर्माण करत असल्याचा घणाघात ऑल इंडिया पॅथर सेनेचे दिपक केदार यांनी केला आहे.
आज बीड येथे दीपक केदार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते पुढे बोलतांना दीपक केदार म्हणाले की, मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी आंदोलनकरत आहे. त्यांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर फक्त एक दिवसाची परवानगी दिली जाते.
आझाद मैदानावर दोन दोन तीन तीन महिने आंदोलन चालले मग मराठा समाजाच्या आंदोलनाच एक दिवसाची परवानगी का दिली जाते. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत. शासनाचे प्रतिनिधी जरांगे यांच्यावर टिका करतात. मंत्री नितेश राणे तीन फुटाचे आहेत आणि जरांगेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांना कोणाचे समर्थन आहे हे कळत नाही का?राणे असतील लाड असतील, चित्रा वाघ असतील ही सगही माणसं जरांगेंच्या विरोधात बोलत आहेत. म्हणजे हे सरकारच्या हातचे बाहुले आहेत असे सांगून केदार म्हणाले की, माझं पुर्वी पासूनच मराठा समाजाच्या आंदोलनाला समर्थन आहे. मी आझाद मैदानावर जाणार आहे. दोन दिवसापुर्वी हाके गेवराईत आले त्यांच्यामुळे राडा झाला. त्यांना गेवराईत यायची गरज नव्हती. हाके सामाजिक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप ही केदार यांनी केला आहे.






