
पाटोद्यासह तालुक्यातील गावात बंद
पाटोदा (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून मराठा समाजाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंब्यासाठी आज पाटोदा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले त्यासोबतच अन्य छोट्यामोठ्या गावांनीही बंद पाळून जरांगे पाटलांना पाठिंबा दिला.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला. गेल्या तीन महिन्यांपूर्वी आरक्षण द्या नसता मी मुंबईत येऊन उपोषणाला बसेल, असा इशारा देत आंदोलनाची थेट तारीख जाहीर केली. मात्र सरकारने त्यांच्या इशार्याकडे दुर्लक्ष केले. गेल्या पाच दिवसांपूर्वी ते लाखो मराठ्यांना सोबत घेऊन मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आता या उपोषणाचे पडसाद मुंबई बाहेर उमटताना दिसून येत असून आज पाटोदा शहर बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. पाटादेा शहरासह तालुक्यातील अन्य गावांनीही या बंदमध्ये सहभाग नोदंवल्याचे दिसून येते.









