
मुंबईच्या सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये बैंक, प्रलंबीत कामे तात्काळ करण्याच्या सूचना
मुंबई (रिपोर्टर): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये अहिल्यानगर -बीड-परळी या नवीन रेल्वे मार्गाच्या कामाबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत या रेल्वे मार्गावरील वेगवेगळ्या कामांचा, अडीअडचणींचा आढावा घेत लवकरात लवकर प्रलंबीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना अजित दादांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बीड येथून रेल्वेत बसून अहिल्यानगरला जाणार, असे गेल्या बीड दौर्यात त्यांनी म्हटले होते. त्यानुसार या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळावी, त्या रेल्वे मार्गाच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात म्हणून आज अजितदादांनी मुंबईच्या सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये रेल्वे संदर्भात असलेल्या जबाबदार अधिकारी अणि अन्य लोकांसोबत महत्वपूर्ण बैठक घेतली. या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचा आढावा घेतला, रेल्वे संदर्भात नवीन धोरण, जमीन करेदी संबंधी येणार्या अडचणी, स्थानकांसाठी आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अन्य प्रलंबीत विषय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रकल्पासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही या वेळी देर्यात आले. त्याचप्रमाणे प्रलंबीत कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना योग्य त्या सूचना केल्या. या प्रकल्पामुळे रेल्वेसेवा सुधारून नागरिकांच्या प्रवासात सोयीत भर पडेल आणि या भागाचा सर्वांगीन विकास साध्य होईल, अशी खात्रीही त्यांनी या वेळी व्यक्त केली. तशा आशयाची पोस्ट दादांनी सोशल मिडियावर टाकली आहे.








