
वडवणीचे संतोष पवार यांचे एकदिवसीय तहसील समोर धरणे आंदोलन
वडवणी (रिपोर्टर ):-बंजारा समाजाला हैदराबाद लागू करून समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा. या मागणीसाठी आज बंजारा युवा शक्तीचे संस्थापकीय अध्यक्ष तथा युवा नेते संतोष पवार यांचे वडवणी तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला हजारो समाज बांधवांनी भेट देत पाठिंबा दिला आहे. यावेळी तहसील परिसरात विविध घोषणांनी दणाणून गेले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर बंजारा समाज बांधव देखील तितक्याच पोटतिडकिने आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज बंजारा युवाशक्तीचे संस्थापकीय अध्यक्ष तथा युवा नेते संतोष पवार हे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वडवणी तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसले आहेत. हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाचा देखील अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) प्रवर्गामध्ये समावेश करावा. या दोन मागणीसाठी सदरील आंदोलन सुरू आहे.
हे आंदोलन सुरू असताना वडवणी तालुक्यासह जिल्हाभरातील हजारो बंजारा समाजाच्या बांधवांनी या आंदोलना स्थळी भेट दिल्या असून आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. संत सेवालाल महाराज की जय, आरक्षण कसं भेटत नाही मिळालाच पाहिजे, हैदराबाद गॅजेट लागू करा, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये तात्काळ समावेश करावा. अशा घोषणा यावेळी दिल्या तहसील परिसर या घोषणामुळे दणाणून गेले होते. व आंदोलन स्थळी देखील हजारो जणांची उपस्थिती दिसून आली. बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश न केल्यास या पेक्षाही तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा बंजारा युवाशक्तीचे संस्थापकीय अध्यक्ष तथा युवा नेते संतोष पवार यांनी शासन- प्रशासनाला दिला आहे.







