
शाळकरी मुलांना येण्या जाण्यास त्रास, काम तात्काळ न केल्यास आंदोलनाचा इशारा
बीड, (रिपोर्टर)ः- शहरातील तेलगाव नाक्यावर महामार्गाचे काम सुरू असून या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले त्याच बरोबर पाईपलाईनचे काम सुध्दा अर्धवट राहिले आहे. अर्धवट कामामुळे या परिसरात अपघात होवू लागले. याच परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास त्रास होवू लागला. सदरील रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे नसता आंदेालन छेडण्याचा इशारा या भागातील नागरीकांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यापासून तेलगाव नाक्यावर महामार्गाचे काम करण्यात येत आहे हे काम अर्धवट झाले आहे तर काही ठिकाणी पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आले. अर्धवट कामाच्या संदर्भात नागरीकांनी इंजि.भोपळे यांच्याची संपर्क देखिल साधलेला आहे. हे काम तात्काळ करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. अर्धवट कामामुळे बार्शी नाका, तेलगाव नाका या परिसरात आतापर्यंत अनेक अपघात झाले. या परिसरामध्ये काही शाळा आहेत. शाळेत जाण्यासाठी मुलांची दररोज ये जा असते. रस्ता व्यवस्थीत नसल्याने मुलांना त्रास होत असून अर्धवट कामे तात्काळ पूर्ण न केल्यास आंदेालन छेडण्याचा इशारा कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना देण्यात आला आहे. यावेळी सय्यद सादेक, धनुरे अनिल, शेख मोईज, शेख अतिक, शेख सत्तार, शेख अजर, सय्यद नुर, शेख रईज, शेख शकिल, सागर शिंदे, समीर पठाण, शेख समशीर, शेख रियाज, मोहसीन खान, अमन कुरेशी, रवि राऊत यांची उपस्थिती होती.








