
मुलीचा रामगड परिसरामध्ये आज सकाळी आढळला मृतदेह
दोन दिवसापूर्वी बापाने इमामपूर रोडवर घेतली होती फाशी
बीड (रिपोर्टर)ः- बीडपासून काही अंतरावर असलेल्या इमामपूर रोड परिसरात एका व्यक्तीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. सदरील हा व्यक्ती भाटसांगवी येथील होता. या व्यक्तीसोबत त्याची चार वर्षीय मुलगी होती. या मुलीचा बीड ग्रामीण पोलीस व नातेवाईक शोध घेत होते.सदरील मुलीचा मृतदेह आज सकाळी बीडपासून जवळच असलेल्या रामगड परिसरातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. निर्दय बापाने आधी मुलीला फाशी देवून नंतर त्याने फाशी घेतली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाली होती.
बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या इमामपूर रोड परिसरात जयराम बोराडे यांने 9 सप्टेंबर रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. याची माहिती पोलीस प्रशासन आणि त्याच्या नातेवाइकांना झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस व नातेवाईक दाखल झाले होते. जयराम याच्या सोबत त्याची 4 वर्षीय मुलगी अक्षरा बोराडे असल्याचे समोर आले होते. अक्षरा बोराडे ही नेमकी कोठे आहे. याचा शोध घेतला जात होता. पोलीस प्रशासनाने मुलगी आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले होते. मात्र दुर्देवी घटना अशी की, या मुलीचा मृतदेह आज सकाळी बीड पासून जवळ असलेल्या रामगड शिवरातील एका लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. जयराम बोराडे यांने आधी मुलीला फाशी देवून नंतर इमामपूर रोडवर जावून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलीला मारुन स्वतः जयराम बोराडे यांने आत्महत्या का केली? या प्रकरणाचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहे. निर्दयी बापाने चिमुकली मुलीचा खून करुन स्वतःचा जिवन संपवल्याने संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.








