
संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
बीड, (रिपोर्टर)ः- धाराशिव जिल्ह्यातील तांत्रिक सहाय्यकावर हल्ला करण्यात आला असून सदरील हल्लेखोराविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी बीड पंंचायत समिती येथील ऑपरेटर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तांत्रिक सहाय्यक रविंद्र राख व डाटा एन्ट्री ऑपरेटर कृष्णा बांगर यांच्यावर काही अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. या हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बीड येथील ऑपरेटर संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शेख अखिल, सुमन सांगळे, सोनवणे, वारे, एस.एस.शेख, सानप, म्हेत्रे, जोगदंड, अन्सारी, अमोल, खडके, सानप, शिंदे, कुटे, इंगोले, शेरकर, दाभाडे, गवते, सपकाळ, वैगुंडे, ए.ए.गवते, मवाले, कोटूळे, सरवदे, आमेर, चारमले, गिरी, पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.








