
सरकार सजग आहे, कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही-धनंजय मुंडे
लातुर, (रिपोर्टर)ः- ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होवू पाहत आहे. म्हणुन एका तरूणाने आरक्षण वाचावं यासाठी चालणार्या आंदोलनामध्ये आपल्या जिवनाची आहोती दिली आहे. जिवनाीच आहोती देतांना त्याला तीन मुली, एक मुलगा, पत्नी, घर दार काहीच दिसलं नाही असे निर्णय घेवु नका. कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. ज्यांच्यासाठी आरक्षण मिळणार आहे तेच आत्महत्या करू लागले तर मग ते आरक्षण द्यायचे कोणाला? म्हणून असा अतितय पणा करू नका असं म्हणत आता सामाजिक, बांधिलकी प्रस्तावित करण्याची खरी गरज असल्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी म्हंटले.
ते लातूर जिल्ह्यातील रेणापुर येथे आत्महत्या ग्रस्त कराड कुटूंबियांची सांत्वन पर भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. रेणापुर येथील भरत कराड या तरूणाने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलना दरम्यान आत्महत्या केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले, आधार दिला. माध्यमांशी बोलतांना आ.धनंजय मुंडे म्हणाले, आरक्षणाला धोका पोहचतोय म्हणून एका तरूणाने आरक्षण वाचावं त्याच्यासाठी चालणार्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहोती दिली. जिवनाची आहोती देतांना त्याला तीन मुली, एक मुलगा, बायको, घर दार काहीच दिसलं नाही आणि ही तिव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून पहायला मिळते. माझी हात जोडून पहिल्यांदा विनंती आहे. ज्यांच्यासाठी आरक्षणाचा फायदा होणार आहे तेच जर आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचे कोणाला.
म्हणून कोणीही आता तरी आत्महत्या करून नका सरकार अतिशय सगज आहे. मा.मुख्यमंत्र्यांनी मा, उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही याची खात्री घेतली, याची जबाबदारी घेतली. यामध्ये या सर्व गोष्टी पाहत असतांना आपण आपल्यामध्ये सुधारणा करा.आता छत्रपती,शिव,शाहु, फुले, आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकुस घालून दिला. ते आता पहायला मिळत नाही.दोन जातीचे जिवलग मित्र एकमेकांच्या जिवावर उठायला लागलेत आणि काही जिल्ह्यात तर पोलिसांच्या ड्रेसवर आडनाव लावायची सुध्दा बंदी आहे. हे छत्रपती,शाह,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. म्हणून आता आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील आणि पुन्ही ही समता या ठिकाणी प्रस्तावित करावी लागेल.
माझी सर्व तरूणांना विनंती, मग ते कुठलंही आरक्षण असु असा अतिताई पणा करू नका, आत्महत्या करू नका कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हंटले.








