
बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्हा विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून ते लवकरच पुर्णत्वास जात आहे. जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींना सोबत घेत जिल्ह्यात विमानतळ बांधण्याचे काम लवकरच सुरूवात होत असून त्याची पुर्व तयारी म्हणून विमान प्राधीकरणााला 40 कोटीचा निधी सुपूर्द केला असून जिल्ह्यावासाीयांनी बघितलेले स्वप्न पुर्णत्वास जात असून आज बीड येथून बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ होत असून ही रेल्वे पुढे पुणे ते मुंबई पर्यंत जोडण्यात येणार असून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार पुुढे म्हणाले की, बीड हे मराठवाडा हे मुक्ती संग्राम दिनाचे मुख्य केंद्र असून या जिल्ह्याच्या सिमा छत्रपती संभाजी नगर, जालना, अहिल्यानगर, धाराशिव या जिल्ह्याला लागून असल्याने मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीचे केंद्र बीड हे झाले होते. अंबाजोगाई येथील स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तिर्थ यांनी या लढ्यात प्रमुख सहभाग होता.

पोलीस मुख्यालय याठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते ोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडीत, जिल्हाधिकारी जॉसन, मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनित कांवत आदि मान्य उपस्थित होते. पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सर्वात मोठी चळवळ बीड जिल्हयाने उभारली असून यात विजेंद्र काबरा, बाबासाहे परांजपे, दिंगाबर बोबडे, काशीनाथ जाधव, जालना जिल्ह्याचे दगडाबाई शेळके आणि संभाजी नगर येथून गोविंद भाई सराफ यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची चळवळ चालवून हैद्राबादच्या निजामाच्या तावडीतून मराठवाड्याला मुक्त केले. मराठवाड्यातील स्त्री, पुरूष आणि लोकांनी ही चळवळ हाती घेत मराठवाड्याला स्वतंत्र मिळवून दिले.

विद्यमान सरकार ही जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देत असून जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रकल्प सुरू झाले आहे. काही मंजूर झालेले आहे. तर काही पुर्णत्वास जात आहे. या प्रकल्पासाठी कोठेही निधी कमी पडू दिला जात नाही. औद्योगीक क्षेत्राला कुशल मनुष्यबल उपलब्ध व्हावे म्हणून बीड येथे दोनशे कोटी रुपये खर्च करुन ट्रिप्पल सिआयटी केंद्राचे काम सुरू झाले आहे. यातून वर्षाला किमान 8 हजार प्रशिक्षीत युवक बाहेर पडणार असून त्यांना रोजगार मिळणार आहे. प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जिल्हाधिकारी कायार्लयाचे काम चालु आहे, सार्वजनीक बांधकाम विभागाची इमारत बांधून पूर्णत्वास नेली आहे. तिचे ही लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. सहकार भवन, उद्योग भवन, महसुल भवन, आदि प्रशासकीय इमारती मंजूर केले असून त्यांचे काम लवकरच सुरू होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये 14 आणि 15 सप्टेंबरला झालेल्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्तमुळे शेतकर्यांचे पिकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पशु हाणी झालेली आहे. दोन व्यक्ती मयत झालेले आहे. या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. आष्टी तालुक्यात पुरात अडकलेल्या लोकांना एनडीआरएफ आणि लष्कराच्या हॅलीकॉप्टरने सुरक्षीतपणे बाहेर काढण्यात यश आलेले आहे.








