
बीड, (रिपोर्टर)ः- बीड येथे मराठा आरक्षणा संदर्भात हैद्राबाद गॅझेट नुसार राज्याचे उमपुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरूपात बीड तालुक्यातील पाच व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येवून मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी हुतात्मे पतकारले अशांच्या वारसांनाही आर्थिक मदतीचे धनादेश अजित पवारांच्या हस्ते वाटप करण्यात आले तर बीड जिल्ह्यामध्ये 14 व 15 तारखेला झालेल्या अतिवृष्टी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आष्टी तालुक्यातील दोन मयत व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली. सोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीड जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वराजोहन पोलीस ग्राउंड या ठिकाणी करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील नागरीकांना पवार यांनी संबोधित केले. त्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश काढला. या आदेशानुसार बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच या शासन आदेशानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे प्रतिनिधी स्वरूपात वाटप केले. उद्या पासून नियमितपणे या हैद्राबाद गॅझेट नुसार जिल्ह्यातील नागरीकांना कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रस्ताव दाखल करून ते देण्यात येणार आहे तर गाव पातळीवर शासन आदेश नुसार गठीत केलेली समितीही कार्यन्वित होणार आहे.








