बीड (रिपोर्टर)ः- जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. आरोग्य विभागाला आज ५७४ रुग्णाचे आहवाल आले. यामध्ये ५४२ निगेटिव्ह तर ३२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आतापर्यंत १६८७२ जण बाधीत आढळून आले आहेत.
कोरोना गेला असे म्हणून नागरीक सार्वजनीक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावू लागले आहे. या कार्यक्रमात ना सोशल डिस्टन्स ना मास्कचा वापर होतो. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण बीडमध्ये पुन्हा वाढू लागले आहेत. आतापर्यंत बीडजिल्ह्यात १ लाख ८१ हजार १३० संशीयतांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामधील १ लाख ६४ हजार २८६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १६८४० जण बाधीत आढळून आले आहे. त्यात आज ३२ रुग्णांची भर पडली. कालपर्यंत बीड जिल्ह्यात ५३३ जणांचा मृत्यु झाल्याची नोंद आहे. जिल्हयाचा पॉझिटिव्ह रेट १२.१ टक्का तर मृत्युदर ३.१६ टक्के आहे. तर रिकव्हरी रेट ९५.२२ वर जावून पोहचला आहे. काल पर्यंत बीड जिल्ह्यात एकुण १६०७१ जण कोरोना मुक्त झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. तर आज बीड जिल्ह्यातील २१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.आज आढळलेल्या ३२ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अंबाजोगाई -७, आष्टी-१, बीड-१८, गेवराई केज, परळी प्रत्येकी-१ तर माजलगांव मध्ये ३रुग्ण आढळून आले आहे.