Wednesday, January 27, 2021
No menu items!
Home बीड बीड तहसिलदारांचे लक्ष आता मुरूम तस्करांवर

बीड तहसिलदारांचे लक्ष आता मुरूम तस्करांवर


शनिवारी सकाळी पकडल्या दोन मुरूमच्या वाहतूक करणार्‍या गाड्या
बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात वाळू तस्कारांची दादागिरी आणि प्रशासनावर वाळू संदर्भात दबाव यातच प्रशासकीय कर्मचार्‍यांवर होणारे हल्ले अशा कोणत्याच गोष्टीला न घाबरता बीड तहसिलदार सुशांत शिंदे यांचा गौन खनीज संबंधीच्या कारवाया सुरू असून शनिवारी शिंदे यांनी मुरूम घेवून जाणार्‍या वाहनांवर कारवाई केल्याने आता मुरूम माफीयामध्ये दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे गौन खनीज म्हणून फक्त वाळूकडेच पाहीले जायचे. मुरूम व नदी नाल्यातील रोडा याची सर्रास तस्करी होत होती. प्रशासनाला अंधारात ठेवून मुरूम माफीया वरील तस्करी करत होते.आता मात्र तहसिलदार शिंदे यांनी तस्करा विरोधात कंबर कसली असून बर्‍या प्रमाणात बीड तालुक्यातून होणारे गौन खनीज तस्करीवर लगाम लागलेली दिसून येत आहे.
शनिवारी सकाळी गुप्त माहिती मिळाल्यानंतर बीड तहसिलदार सुश०ांत शिंदे व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांनी मिळालेल्या माहितीनूसार शहरातील आशा टॉकीज व इमामपूर रोड या परिसरात सापळा रचला. त्याच वेळी मुरूमची अवैध वाहतूक करणारे वाहन दिसून आल्यानंतर सबंधीत वाहन चालकाची चौकशी केली असता. कोणत्याही प्रकारची परवानगी पावती त्या वाहन चालकांसोबत आढळून आली नसल्याने दोन्हीही गाड्या ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे वाळू तस्करी करताना माफीया घाबरत असे म्हणून मुरूमाची सर्रास तस्करी सुरू आहे. तहसिलदार शिंदे यांनी मुरूम संदर्भात लक्ष घातल्याने गौन खनीजाची रक्षण होणार यात काही शंका नाही.

पदभार घेतल्यानंतर सुधारणा
बीड तहसिलदार सुशांत शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले. म्हणूनच तहसिल कार्यालयाची सध्यातरी कायापालट झालेली दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर शिंदे यांनी बीड तालुक्यातील घाण स्वच्छ करण्याचे विडा उचलल्याचे दिसून येत आहे. त्याचे ताजे उदाहरण शनिवारी मुरूमाच्या गाड्यावर कारवाई केल्यानंतर दिसून आले.

Most Popular

ड्रग्ज आऊट ऑफ कंट्रोल शहरात एकाचा बळी

ग्राऊंड रिपोटींग- शेख रिजवान कोडिन व कॉस्मेटीक पदार्थाचा जास्त...

पेठबीड पोलिसांनी रोखला बालविवाह

पोलिसांनी वधू-वर पित्यास दिली समजबीड (रिपोर्टर)- सोलापूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा पेठ बीड हद्दीतील खडकपुर्‍यातील एका मंगल कार्यालयात धुमधडाक्यात विवाह होत होता....

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडाबीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे...

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस अधिक्षक आर. राजा यांचा सन्मान

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थी , पोलीस दलातील...