
बीड (रिपोर्टर): छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाच्या दुरावस्थेविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बीड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण हे शहरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांसाठी महत्वाचे केंद्र असले तरी हे मैदान पूर्णपणे दुरावस्थेत गेले आहे. मैदानात वाढलेले गवत, स्वच्छतागृहाची दुरावस्था तसेच क्रीडांगणाचा वापर खेळाऐवजी राजकीय, सामाजीक, व्यवसायिक कामासाठी होत असल्याने मैदानात चिखल आणि वाहनांच्या खोल खुणा निर्माण झाल्या आहेत. सदरील हे क्रीडांगण दुरुस्त करण्यात यावे या मागणीसाठी आज सामाजीक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. या वेळी डॉ. गणेश ढवळे, तांदळे, नितीन सोनवणे, रामधन जमाले, अशोक येडे, नितीन जायभाये, सखाराम बेंगडे, शेख मुबीन, शेख मुश्ताक यांच्यासह आदींची उपस्थिती होती.








