
दोन महिन्यात दीडशे शेतकर्यांनी जीवन संपविले
बीड (रिपोर्टर): ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. यामध्ये शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील शेतकर्यांचे झाले. शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या. गेल्या दोन महिन्यांच्या कार्यकाळात मराठवाड्यात दीडशे शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे महाराष्ट्रातल्या जवळपास 70 लाख हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान मराठवाड्यातील शेतकर्यांचे झाले. शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. मराठवाड्यात आधीच शेतकरी आत्महत्या जास्त प्रमाणात होत असताना त्यात पुन्हा अतिवृष्टीची भर पडल्याने आत्महत्या अधिकच होऊ लागल्या. गेल्या दोन महिन्यांच्या कार्यकाळात मराठवाड्यातील दीडशे शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत.








