
अध्यक्षपदी डी.बी. खान यांची निवड
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील सौर ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणण्यासाठी ‘बीड डिस्ट्रिक्ट सोलार वेंडर्स असोसिएशन’ ची स्थापना करण्यात आली. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 4 ऑक्टोबर 2025) रोजी यशराज इन, जालना रोड, बीड येथे पार पडला.
या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व सोलार व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमध्ये असोसिएशनच्या पदाधिकार्यांची निवड एकमताने करण्यात आली.पदाधिकारी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष – डी. बी. खान, उपाध्यक्ष – संजय सानप, सचिव – गोपाळ पारीख, कोषाध्यक्ष – अशोक सिकची,
कार्यकारी सदस्य – अनिल राऊत, वल्लभ दिवटे, उमेश करपे असोसिएशनचे उद्देश
असोसिएशनच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश म्हणजे खोट्या आणि दिशाभूल करणार्या सोलार जाहिरातींना आळा घालणे, ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सोलार प्रकल्पांबाबत पारदर्शकता राखणे हा आहे.
सभासदांना सोलार क्षेत्रातील अद्ययावत माहिती व प्रशिक्षण देणे, शासकीय कार्यालयांमधील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या सर्व सौर ऊर्जा योजनांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करणे हेही संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
याशिवाय चछठए आणि चडएऊउङ सोबत समन्वय साधून गुणवत्तापूर्ण सोलार इंस्टॉलेशनला प्रोत्साहन देणे, सोलार वेंडर आणि ग्राहक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणे आणि हरित उर्जेचा प्रसार करणे, या दिशेने असोसिएशन कार्यरत राहणार आहे. सभेच्या शेवटी उपस्थित व्यावसायिकांनी संघटनेच्या स्थापनेबद्दल समाधान व्यक्त करत बीड जिल्ह्यातील सोलार क्षेत्रात शिस्त, गुणवत्ता आणि ग्राहकहिताचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.








