
दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): कापसाच्या व्यापाराच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन एका 35 वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना गेवराई तालुक्यात घडली असून या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वचिष्ठ भीमराव ठोसर याचे कल्पेश संतराम काळे व सचीन काळे (रा. वडगाव ता. गेवराई) या दोघांनी पैशाच्या कारणावरून अपहरण केले. या प्रकरणी भीमराव देवराव ठोसर याने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापसाच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात कलम 124, 137, 351, 351 (3) 3 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास गेवराई पोलीस करीत आहे. सदरील ही घटना 29 सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडलेली आहे. ज्या तरुणाचे अपहरण करण्यात आले, त्या तरुणाचा मोबाईल बंद येत असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीचे लोकेशन गेवराई पोलीस ट्रेस करत असून ज्या तरुणाचे अपहरण करण्यात आले त्याचा शोध घेतला जात आहे.









