
कम्युनिस्ट पार्टीचे तीव्र निदर्शने
बीड (रिपोर्टर): नद्यांना पूर आल्याने राज्यातील शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरीक मजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली मात्र ही नुकसानभरपाई अत्यंत कमी आहे. जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी आज कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. यामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले, पुराचे पाणी शेतात, घरात घुसल्याने नुकसान झालेले आहे. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली मात्र ही नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी असून योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी कॉ. नामदेव चव्हाण, भाऊराव प्रभाळे, ज्योतीराम हुरकुडे, बी.जी. तांदळे, गहिवळे, संजय तांदळे, जगन्नाथ जाधव, अरुण कानडे, मोहन परजने यांच्यासह आदींची उपस्थिती होती.








