
शेख शौकत यांनी स्वखर्चातून बांधला पूल.
पिंपळनेर (रिपोर्टर): गेल्या अनेक वर्षापासून या वाकनाथपूर गावांतील नागरीक नदीवरती पुलाची मागणी करत होते.या गावच्या तिन बाजूस नद्या आहेत. परंतु कोणत्याही नदीवर पुल बांधलेला नव्हता. शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी जी बस येते तिला देखील नदीवर पुल नसल्याने 6 ते 7 किलोमिटर दुरून यावे लागते. पुल नसल्यानें गावातील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. या नदीवर पूल नसल्यानें वाकनाथपूर या गावचे दळण वळण बंद पडत असून, याचा विचार करून गावातील सर्व साधारण नागरीक शेख शौकत यांनी गावातील पश्चिम बाजुच्या नदीवर स्व खर्चात छोटा पुल बांधण्याचा निर्णय घेतला होता. हा पूल बांधून पूर्ण झाला आहे.
या पुलाच्या बांधकामासाठी पंचक्रोशीतील नागरिकांना या कामासाठी काही सहकार्य करायचे असेल तर शेख शौकत यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती देखील करण्यात आली होती. हे गाव गेवराई मतदार संघात येत असुन लोकप्रतिनिधींनी या गावाच्या मुख्य रस्त्यावरील नदीवर लवकरात लवकर एक मोठा पुल बांधुन या होणार्या अडचणी दूर कराव्या अशी मागणी होत आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून शेख शौकत यांच्या कार्याची सगळीकडे प्रशंसा केली जात आहे.







