
परळी वैजनाथ (रिपोर्टर) :- परळी तालुक्यातील लमान तांडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या केशवनगर तांडा येथील गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रलबीत विजेचा प्रश्न आ.धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लावल्याबद्दल गावचे सरपंच विजय राठोड व उपसरपंच कुंडलिक जाधव यांनी आभार व्यक्त केले आहेत.
लमान तांडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या केशवनगर तांडा येथे ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने ग्रामस्थ व नागरिकांना अडचण होत असल्याचे लक्षात घेत सरपंच विजय राठोड यांनी धनंजय मुंडे यांना विषय सांगता प्रश्न तात्काळ सोडविला. 63 चा डीपी रोहित्र मंजूर करण्यात आला. अनेक दिवसापासून रखडलेले विज प्रश्न आ. धनंजय मुंडे साहेब यांनी मार्गी लावल्याबद्दल व तसेच महावितरणचे अभियंता श्री राठोड साहेब यांचेही सरपंच विजय राठोड व उपसरपंच कुंडलिक जाधव यांनी आभार मानले आहेत.








