
बीड जिल्ह्याला पहिल्यांदा मिळाला मान
बीड (रिपोर्टर): बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तन्जीम तरक्की उर्दूचे जिल्हाध्यक्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उर्दू विभागाचे अशासकीय सदस्य असलेले सय्यद हसीन अख्तर यांची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकॅडमीच्या कार्याध्यक्षपदी नियूक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला.
बीड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर असणार्या हसीन अख्तर यांची महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रुपाने बीडला हा प्रथमच मान मिळाला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. राज्य सरकारने याचा स्पेशल जीआर काढला आहे.








