बीड (रिपोर्टर): आ. संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शेख मुजीब ( दाजी ) यांच्या पत्नी तेजस्विनी दादाराव पारवे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष झुंजार धांडे यांनी केली आहे. सक्षम आणि सर्व समावेशक चेहरा म्हणून जनतेतूनही त्यांच्या नावाला पसंती आहे. त्यामुळे आ. संदीपभैय्या यांनी शेख मुजीब यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे असे धांडे यांनी म्हटले आहे.
बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शेख मुजीब ( दाजी ) हे योग्य उमेदवार आहेत. त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी झुंजार धांडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आ. संदीपभैय्या यांची देखील भेट घेतली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून असे त्यांनी सांगितल्याचे धांडे यांनी म्हटले आहे. बीडमध्ये सध्या केवळ शेख मुजीब यांच्याच नावाची चर्चा आहे. सर्वधर्मीयांना सोबत घेऊन सलोखा जपण्याचे काम त्यांनी केलेले आहे. सर्व समावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा चेहरा म्हणून लोक आज त्यांच्याकडे पाहत आहेत. भविष्यात हा चेहरा पक्षासाठी देखील फायदेशीर ठरणारा आहे. त्यामुळेच आज सर्व स्तरातून त्यांच्या उमेदवारीची मागणी होऊ लागली आहे. आ. संदीप क्षीरसागर यांनी शेख मुजीब यांच्या पत्नी तेजस्विनी दादाराव पारवे यांना उमेदवारी दिल्यास आणि ते तुतारी हे चिन्ह घेऊन जनतेत गेल्यास नगराध्यक्ष पदासह बीड नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा झेंडा फडकेल असा विश्वास झुंजार धांडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आ. संदीपभैय्या यांनी शेख मुजीब यांची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी धांडे यांनी केली आहे.










